नाशिक : सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचा बहाणा करत एका सराफ दुकानदाराने माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे कोट्यवधी रुपयांचे दोनशे तोळे सोन्याचे दागिने हडपल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेबाबत खुद्द माजी महापौर मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सराफ व्यावसायिक संशयित आरोपी योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुर्तडक व दाभाडे यांची ओळख असून त्या ओळखीतून दाभाडे याने मुर्तडक यांना सोन्या-चांदीचे दागिने अल्पावधीत दुप्पट करून देण्याचा बहाणा करत मुर्तडक यांचा विश्वास संपादन केला. दोन वर्षांपूर्वी मुर्तडक यांच्या आई तसेच मावशी यांनी हे दागिने कुटुंबातील सून, नात व सदस्यांना वाटून दिले होते. त्यानंतर दाभाडेवर विश्वास ठेवत टप्प्याटप्प्याने दागिने त्याच्या ताब्यात दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे दागिने वाढवून न मिळाल्याने त्याने दागिने परत दिले नाहीत. दागिने देण्याबाबत तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदविली.

COMMENTS