Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक मंडळातील पाच कार्यालयांना आयएसओ मानांकन

महावितरणच्या तीन विद्युत उपकेंद्रे व दोन शाखा कार्यालयांची कामगिरी

नाशिक- महावितरणच्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडीत सेवा देण्यासाठी कार्यालयांमध्ये, उपकेंद्रामध्ये व दैनंदिन कार्यात ग्राहक सेवेसाठी भरी

स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!
श्रमदान’ एक तारीख एक तास – निरामय करू प्रत्येक श्वास’ स्वच्छता अभियानात मानवधन संस्थेचा प्रण 
पोलीस निरीक्षकाची दादागिरी नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी मारहाण.

नाशिक– महावितरणच्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडीत सेवा देण्यासाठी कार्यालयांमध्ये, उपकेंद्रामध्ये व दैनंदिन कार्यात ग्राहक सेवेसाठी भरीव कार्य करून आयएसओ प्रमाणपत्र मिळविलेल्या कार्यालयांची इतरांनी प्रेरणा घेऊन महावितरणच्या नाशिक परिमंडलातील सर्व विद्युत उपकेंद्रे आणि कार्यालये यांना आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी संपूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आवाहन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत नाशिक मंडळ अंतर्गत असलेल्या गोविंद नगर विद्युत उपकेंद्र, गणेश चौक कक्ष कार्यालय, ओझर ग्रामीण कक्ष कार्यालय, दिक्षी विद्युत उपकेंद्र आणि जळगाव(निघोज) या महावितरणच्या कार्यालये व उपकेंद्रे यांना नुकतेच आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आयोजित कार्यक्रमात अभियंते, यंत्रचालक जनमित्र व सहकाऱ्यांनी कमी कालावधीत संघटितपणे अथक परिश्रम आणि कालबद्ध कृती आराखडा राबून हे यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.  

या सर्व ठिकाणी आयॊजीत कौतुक सोहळयात आयएसओ मानांकन कोनशिलाचे अनावरण तथा आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक शहर विभाग १ मधील सिडको उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३/११ के.व्ही. गोविंद नगर या विद्युत उपकेंद्राला तसेच गणेश चौक कक्ष कार्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले त्यानिमित्त यासाठी सातत्याने परिश्रम घेणारे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप पाटील, सहाय्यक अभियंता राहुल शिंदे, सर्व यंत्रचालक व जनमित्र यांचा सन्मान मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

तसेच नाशिक ग्रामीण विभागातील ओझर उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३/११ के.व्ही. दिक्षी या विद्युत उपकेंद्राला तसेच ओझर ग्रामीण कक्ष कार्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले त्यानिमित्त यासाठी सातत्याने परिश्रम घेणारे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता शिंदे, सहाय्यक अभियंता सुवर्णा मोरे तसेच सर्व यंत्रचालक व जनमित्र यांचा सन्मान मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

चांदवड विभागातील निफाड उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३/११ के.व्ही. जळगाव(निघोज) या विद्युत उपकेंद्राला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले त्यानिमित्त यासाठी सातत्याने परिश्रम घेणारे कार्यकारी अभियंता केशव काळूमाली, उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, सहाय्यक अभियंता हेमंत शिनकर व सर्व यंत्रचालक व जनमित्र यांचा सन्मान मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.     

नाशिक परिमंडळात बहुसंख्येने महावितरणची कार्यालये आयएसओ मानांकन प्राप्त करीत असून त्यामुळे दैनंदिन कार्याच्या नोंदी उपलब्ध राहणार असल्यामुळे देखरेख ठेवण्यास सुविधा निर्माण होणार आहे. याचा फायदा शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहचून त्यांचा मिळणारा प्रतिसाद समाधान हेच खरे प्रमाणपत्र असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी कार्यक्रमात केले. ग्राहक सेवेचे व्रत घेऊन आपण करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. व इतरांनी सुद्धा याची प्रेरणा घेऊन ग्राहक सेवेकरिता कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ग्राहक सेवा सुधारणे हा या मानांकनाचा मुख्य उद्देश असून मंडळातील सर्वच उपकेंद्रे व कार्यालये उत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या सर्व सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंते चेतन वाडे, राजाराम डोंगरे, केशव काळूमाळी, राजेंद्र भांबर व निलेश चालिकवार, जनसंपर्क अधिकारी विकास आढे हे मंचावर उपस्थित होते. या सर्व ठिकाणी आयॊजीत सोहळयात अभियंते, अधिकारी, जनमित्र, यंत्रचालक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.  

COMMENTS