जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हानी झाली. विविध दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून काही जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.दरहाली नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने राजौरीतील सखल भाग जलमय झाले. नदीचे पाणी संरक्षण भिंत फोडून बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये शिरल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक गाड्या वाहून गेल्या. अनेक घरांचेही नुकसान झाले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.बचाव पथकाच्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट तहसीलमध्ये सर्वाधिक फटका बसला असून मृत्यूंची सर्वाधिक संख्या याच भागात नोंदविण्यात आली आहे. राजौरीमध्ये भूस्खलनाच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सध्या पाच जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.गेल्या दोन दिवसांपासून या भागात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरहाली, खंडली सूक्तोह आणि जमोल या नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरहाली नदीचे पाणी भिंत फोडून बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये शिरल्याने अनेक वाहने वाहून गेली. पूरग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, अब्दुल्ला ब्रिजखालून सुमारे 50 कुटुंबांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. तारिक ब्रिज परिसरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमची पथके प्रत्येक एसओएस कॉलला प्रतिसाद देत आहेत. सध्या जीवितहानी टाळणे हे आमचे प्राधान्य आहे. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असले, तरी पाणी ओसरल्यानंतरच अचूक नुकसानाचा अंदाज येऊ शकेल. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.माता वैष्णो देवी, बाबा अमरनाथ यात्रा स्थगितमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी आणि बाबा अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगर, राजौरी आणि पुंछसह अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS