मुंबई : दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “आता सरकार बदलायचं आहे; ही आग सरकार बदलेपर्यंत टिकवून ठेवा,” असे आवाहन केले.मुंबईत आझाद मैदानात आयोजित केलेल्या या आंदोनलाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचूक, अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाषणात बोलताना, मी आताच एक पोस्टर पाहिलं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, असं त्यात लिहिलं होतं. राजीनामा ही शुल्लक गोष्ट आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, असं परखड मत ठाकरे यांनी व्यक्त केलं.तसेच, धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे. हा लढा फक्त वांगचुक यांचा नाही, असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात व्यापक लढा उभा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सत्ता भ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले.आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी काल नागपुरात होतो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. या संघाच्या होसबळेने कालच्या मे महिन्यात स्टेटमेंट दिलं. पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे. जो पाकिस्तान आतंकवादी घुसवतो. हल्ले करतो त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे. भागवतांना विचारलं तर म्हणतात बरोबर आहे. हम हिटलर जैसे नही है. अहो भागवत साहेब हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगा. पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत का नाही करत? जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा. आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही. अशी माणसं मिळत नाही. एवढा फौजफाटा का आणताय? पाक व्याप्त काश्मीरात घुसवा या फौजा अशी टीकाही केली.

COMMENTS