Homeताज्या बातम्या

मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राष्ट्रहिताची : पालकमंत्री विखे 

अहिल्यानगर: मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.अहिल्यानगर शहर मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा आढावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाढे, उपमहापौर धनंजय जाधव, प्रांताधिकारी सुधीर पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, काही प्रभागांमध्ये मतदार मॅपिंगचे काम समाधानकारक झाले असले तरी काही ठिकाणी हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे.एसआयआर मोहिमेला मुदतवाढ मिळाल्यामुळे उर्वरित काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याची बाब त्यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. दुबार नोंदणी, मृत व्यक्तींची नावे तसेच इतर त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि पक्षाने नियुक्त केलेले प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून स्थलांतर झालेल्या नागरिकांची नावे अजूनही जुन्या मतदार यादीत कायम आहेत. त्यामुळे विशेष पुनरिक्षण मोहिमेत प्रत्येकाने जागरूकपणे सहभाग घेण्याची गरज आहे. काही धार्मिक स्थळांमधून मतदार मॅपिंगचे काम सुरू असल्याची गंभीर बाबही त्यांनी उपस्थित केली. कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले.यावेळी मंत्री विखे पाटील यांनी धार्मिक स्थळांमधून मतदार मॅपिंगचे काम सुरू असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना चौकशीचे निर्देश दिले. तसेच मतदार मॅपिंग व संबंधित प्रक्रिया शासकीय कार्यालये किंवा गावातील शाळांमध्येच पार पाडली जावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक
महाराष्ट्र दिनानिमित्त महिनाभर मोफत नेत्रतपासणी; स्वस्तिक हॉस्पिटलचा उपक्रम; उत्स्फूर्त प्रतिसाद
‘स्थानिक’च्या निवडणुकांत मनसेचा विजयाचा निर्धार; सुपा येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक; संघटन विस्तारवर भर

COMMENTS