शिर्डी : भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आपल्या जुन्या, निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता पक्षाच्या विचारांशी निष्ठा ठेवून कार्यरत राहावे, असे भावनिक आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे यांनी केले. डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते.यावेळी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा, संघपती अनिल पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, प्रगतशील शेतकरी मदनलालजी पिपाडा, भाजपाचे नरेश सुराणा, चेतन कोते, श्रुती पिपाडा, साहील पिपाडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, “राजकारणात प्रत्येकाची वेळ येत असते. त्यामुळे कोणत्याही अडचणींना न घाबरता, निराश न होता आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणे हीच खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देत आला असून भविष्यातही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहील.”यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे वडील तथा प्रगतशील शेतकरी मदनलाल पिपाडा यांनी शेती क्षेत्रातील आपल्या अनुभवांना उजाळा देत प्रा. रामजी शिंदे यांच्याशी विविध कृषी विषयांवर मनमोकळा संवाद साधला.होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रा. राम शिंदे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS