Homeताज्या बातम्या

अकोलेत ४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अकोले : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संसाधन कक्ष, अकोले (मुले) येथे तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती अकोले यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिली ते आठवीतील ४३ दिव्यांग विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील ५ लाभार्थी विद्यार्थ्यांना विविध साहित्य व सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व केंद्रांतील पात्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब दोरगे, विस्तार अधिकारी राजेश पावसे, सविता कचरे, संभाजी झावरे, ज्ञानेश्वर माळवे, जनार्दन भवरे, अनिल गायकवाड, अरविंद कुमावत, सुरेखा फापाळे तसेच केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे, काळुजी भांगरे, रमेश झोळेकर आणि विजय भांगरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब दोरगे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य वितरणानंतर पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष लक्षवेधी ठरला. जि.प. प्राथमिक शाळा, जाचकवाडी येथील दिव्यांग विद्यार्थी पार्थ फापाळे याला साहित्य मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. याबाबतची माहिती शिक्षिका नलिनी जटाडे आणि बाळासाहेब आरोटे यांनी दिली.

दिव्यांगांना दिलासा; श्रीरामपूरमध्येच मिळणार प्रमाणपत्र; महिन्यातून दोनदा तपासणी व वितरणाची सुविधा; आ. काळे यांच्या पाठपुराव्याला यश
एकदरेत पावसासाठी महिलांचे महादेवाला साकडेभजन, पूजा व अभिषेक करून वरुणराजाला प्रार्थना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथ अतिक्रमणमुक्त कराग्राहक पंचायतीचे अकोले नगरपंचायतला निवेदन; पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी

COMMENTS