Homeताज्या बातम्या

महामार्गाच्या कामाबद्दल तक्रारी; खा.बजरंग सोनवणे करणार कामाची पाहणीतेलगाव-बीड राष्ट्रीय महामार्गातील अनेक कामे प्रलंबित

तेलगाव- बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी येत असून महामार्गातील अनेक कामेही प्रलंबित आहेत. यामुळे आज दि.19 जुलै र

नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्‍या पिकांना जीवदान शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण निर्माण
खांबामधील विद्युत प्रवाहाने बैलाचा मृत्यूसहा जण वाचले, नाथापूर येथील घटना
गेवराई आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखलआ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते पाच बसेसचे झाले लोकार्पण



तेलगाव- बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी येत असून महामार्गातील अनेक कामेही प्रलंबित आहेत. यामुळे आज दि.19 जुलै रोजी खा.बजरंग सोनवणे हे स्वत: या कामाची पाहणी करणार आहेत. तसा दौरा देखील खा.सोनवणे यांच्या कार्यालयाकडून जाहिर करण्यात आला आहे.
या दौर्‍यात ते मुख्यत्वे तेलगाव ते बीड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. खा.सोनवणे यांच्या या दौर्‍याची सुरुवात सकाळी 9.30 वाजता केज येथील ’पवनसुत निवास’ येथून तेलगावकडे प्रस्थान करून होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता ते तेलगाव (ता. धारूर) येथे पोहोचतील. महामार्गाची पाहणी करत असताना ते सकाळी 10.15 वाजता लोणवळ फाटा, 10.30 वाजता कुप्पा फाटा, 10.45 वाजता उपळी गोलाई आणि 11.00 वाजता बावी (ता. वडवणी) येथे भेट देतील. यानंतर 11.15 वाजता पुसरा/हिवरगव्हाण, 11.30 वाजता मोरवड दत्तमंदिर, तर 11.45 वाजता बाहेगव्हाण फाटा येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी 12.00 वाजता ते वडवणी शहरात दाखल होतील. त्यानंतर बीड तालुक्यातील मैंदा (दुपारी 12.15), पोखरी फाटा (दुपारी 12.30), घाटसावळी (दुपारी 12.45) आणि डेकणमोहा येथे दुपारी 1.00 वाजता भेट देऊन महामार्गाची पाहणी करतील. त्यानंतर बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला असून, सायंकाळी सोयीनुसार ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील. खा.बजरंग सोनवणे यांच्या या धावत्या दौर्‍यामुळे महामार्गाच्या प्रश्नांना गती मिळण्याची चिन्हे असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

COMMENTS