Homeताज्या बातम्यादेश

मी भाजपची, मात्र भाजप माझा नव्हे

पंकजा मुंडेेंची गडकरीसमोरच जाहीर नाराजी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः विधानसभा 2019 च्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर राज्यातील राजकारणातील त्यांचे परतीचे दोर भाजपन

 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला
पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
…तोपर्यंत फेटा बांधणार नाही ः पंकजा मुंडे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः विधानसभा 2019 च्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर राज्यातील राजकारणातील त्यांचे परतीचे दोर भाजपने कापून टाकले आहेत. त्यांना राष्ट्रीय सचिवपदी संधी दिली असली तरी, त्यांना विधानपरिषदेवर संधी देवून, त्यांचे पुनवर्सन करणे भाजपने टाळले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतांना त्यांनी पुन्हा एकदा थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर थेट नाराजी व्यक्त केली आहे. मी भाजपची आहे. मात्र भाजप पार्टी थोडीच माझी आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे.
पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी महादेव जानकरांच्या नेहमी संपर्कात असते. त्यांच्या रासप पक्षालाही मी नेहमी वेळ देत असते. महादेव जानकर तुम्ही या विषयावर बोला, त्या विषयावर पत्रकार परिषद घ्या, अशा सूचना मी नेहमी त्यांना देत असते. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. मी भाजपची आहे, मात्र भाजप पक्ष माझा नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात केले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. अशातच परिणामांची पर्वा न करता आता पंकजा मुंडे यांनी धाडसाने निर्णय घ्यावा, असे सूचक आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.

वेळ आल्यास रासपमध्ये जाईल – रासप पक्ष हा माझ्यासाठी माहेरासारखाच आहे. तर, भाजप पक्ष वडिलांसारखा आहे. वडिलांकडे काही झालच तर माहेरमध्ये माझ्यासाठी जागा आहेच ना, असे थेट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे मुंडे परिवाराच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाहीच झाले तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे. आम्हाला काही गमवायचे नाही.

COMMENTS