Homeताज्या बातम्या

विष्णुपूरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणीनिकृष्ट कामावरून अधिकार्‍यांना फटकारले, नमुने जप्त!

नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपूरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संरक्षण भिंत ढासळल्याची घटना नुकतीच घडली हो

चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल
Nanded News – विष्णूपुरी जवळील उड्डान पुलाला भगदाड; केंद्रीय पथक दाखल | Saamana (सामना)


नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपूरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संरक्षण भिंत ढासळल्याची घटना नुकतीच घडली होती. या गंभीर दुर्घटनेची केंद्र सरकारने तात्काळ दखल घेतली असून, ’भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण बोर्डा’च्या (छक-ख) 4 सदस्यीय केंद्रीय चौकशी समितीने रविवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पुलाची सविस्तर पाहणी केली. पुलाच्या निकृष्ट बांधकामावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, चौकशीसाठी घटनास्थळावरून साहित्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
या उड्डाणपुलावरून मोठी वाहतूक सुरू असतानाच एका बाजूची संरक्षण भिंत अचानक कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे, भिंत कोसळली तेव्हा तिच्या भरावावर दोन विद्यार्थी उभे होते, जे या अपघातातून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले आणि केंद्र शासनाने तात्काळ केंद्रीय समितीला पाहणी करण्याचे आदेश दिले. केंद्रीय समितीचे सदस्य आर. के. पांडे, ए. के. श्रीवास्तव, अशोककुमार माथुर आणि छाया राजपूत यांनी पुलावरील भराव, मुरुम, गॅबियन नेट आणि इतर तांत्रिक बाबींची बारकाईने तपासणी केली. यावेळी समितीला अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. पहिल्याच पाहणीत वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले.नियमबाह्य भराव: भरावामध्ये चांगल्या दर्जाच्या मुरुमाऐवजी मातीचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पावसाचे पाणी आत झिरपून दाब वाढला आणि भिंत फुगून ढासळली, असा प्राथमिक अंदाज समितीने व्यक्त केला. पुलावरील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत, दोन गॅपमधील अंतर वाढले आहे, रस्ता दबला आहे आणि पावसाचे पाणी बाहेर जाणे गरजेचे असलेले सर्व आउटलेट बंद असल्याचे आढळले. या प्रकारावरून समिती सदस्यांनी संबंधित कंत्राटदार ’केटीएल’ कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर, साईट सुपरवायझर आणि व्यवस्थापनाला चांगलेच फैलावर घेतले.
दुसर्‍या बाजूलाही धोका; तातडीने दुरुस्तीचे आदेश
पाहणी दरम्यान पुलाच्या दुसर्‍या बाजूलाही अशाच प्रकारचा फुगवटा निर्माण झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले. हा भागही अत्यंत धोकादायक बनला असून, कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश समितीने संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. यावेळी केटीएल कंपनीचे मुख्य प्रोजेक्ट डायरेक्टर अमित गर्ग, नांदेडचे व्यवस्थापक श्रीकृष्ण सपकाळ, जनरल मॅनेजर अतुल शिंदे आणि नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर महेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
सध्या आम्ही केवळ प्राथमिक निरीक्षण केले असून तपासणीसाठी साहित्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. आताच कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल आल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल.
आर. के. श्रीवास्तव व अशोककुमार माथूर (समिती सदस्य)

COMMENTS