देवळाली प्रवरा : आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि. ९) देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे उत्स्फूर्त व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील मुक्कामानंतर गुरुवारी सकाळी दिंडी राहुरीच्या दिशेने निघाली. बेलापूर ते देवळाली प्रवरा या संपूर्ण मार्गावर विविध गावांतील ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.देवळाली प्रवरातील बाजारतळावर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम,उपनगरराध्यक्ष बेबी बर्डे, प्रकाश संसारे, अमोल कदम, मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील तसेच शहरातील पदाधिकारी व नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. यानंतर पालखी खांद्यावर घेऊन काकासाहेब चौकातील मारुती मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आली. चव्हाण वस्ती येथे राहुरी तहसील प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. अमित पवार, मंडलाधिकारी निर्मला नाईक, कामगार तलाठी गणेश गर्कळ, राजेंद्र चव्हाण,किरण चव्हाण मंदाताई चव्हाण,नगरसेवक अजित चव्हाण, नगरसेविका आशाताई चव्हाण यांनीही पालखीचे स्वागत केले.यावेळी निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, माधव महाराज राठी, माजी अध्यक्षा कांचन जगताप आदी उपस्थित होते.पालखी सोहळ्यानिमित्त देवळाली प्रवरा नगर परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शहरातील भजनी मंडळांनी मोफत दाढी-कटिंग, चप्पल दुरुस्ती, मसाला दूध, आमटी-भाकरीचे भोजन तसेच विविध प्रकारच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. वारकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ उपदिंड्या सहभागी झाल्या असून, नगर जिल्ह्यात पुढे जाताना वारकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांचा सहभाग सुमारे तिपटीने वाढल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात आठ दिवसांचा मुक्काम नाशिक जिल्हा सोडल्यानंतर पालखीचा अहिल्यानगर जिल्ह्यात पारेगाव (ता. संगमनेर) येथे पहिला मुक्काम झाला. त्यानंतर गोगलगाव, राजुरी (ता. राहाता), बेलापूर (ता. श्रीरामपूर), राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर शहर, साकत (ता. श्रीगोंदा), घोगरगाव, मिरजगाव (ता. जामखेड), कर्जत आणि कोरेगाव असा आठ दिवसांचा प्रवास होणार असून, संपूर्ण मार्गावर स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

देवळाली प्रवरा : आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि. ९) देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे उत्स्फूर्त व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील मुक्कामानंतर गुरुवारी सकाळी दिंडी राहुरीच्या दिशेने निघाली. बेलापूर ते देवळाली प्रवरा या संपूर्ण मार्गावर विविध गावांतील ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.देवळाली प्रवरातील बाजारतळावर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम,उपनगरराध्यक्ष बेबी बर्डे, प्रकाश संसारे, अमोल कदम, मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील तसेच शहरातील पदाधिकारी व नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. यानंतर पालखी खांद्यावर घेऊन काकासाहेब चौकातील मारुती मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आली. चव्हाण वस्ती येथे राहुरी तहसील प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. अमित पवार, मंडलाधिकारी निर्मला नाईक, कामगार तलाठी गणेश गर्कळ, राजेंद्र चव्हाण,किरण चव्हाण मंदाताई चव्हाण,नगरसेवक अजित चव्हाण, नगरसेविका आशाताई चव्हाण यांनीही पालखीचे स्वागत केले.यावेळी निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, माधव महाराज राठी, माजी अध्यक्षा कांचन जगताप आदी उपस्थित होते.पालखी सोहळ्यानिमित्त देवळाली प्रवरा नगर परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शहरातील भजनी मंडळांनी मोफत दाढी-कटिंग, चप्पल दुरुस्ती, मसाला दूध, आमटी-भाकरीचे भोजन तसेच विविध प्रकारच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती.
वारकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ उपदिंड्या सहभागी झाल्या असून, नगर जिल्ह्यात पुढे जाताना वारकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांचा सहभाग सुमारे तिपटीने वाढल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात आठ दिवसांचा मुक्काम
नाशिक जिल्हा सोडल्यानंतर पालखीचा अहिल्यानगर जिल्ह्यात पारेगाव (ता. संगमनेर) येथे पहिला मुक्काम झाला. त्यानंतर गोगलगाव, राजुरी (ता. राहाता), बेलापूर (ता. श्रीरामपूर), राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर शहर, साकत (ता. श्रीगोंदा), घोगरगाव, मिरजगाव (ता. जामखेड), कर्जत आणि कोरेगाव असा आठ दिवसांचा प्रवास होणार असून, संपूर्ण मार्गावर स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

COMMENTS