Homeताज्या बातम्यासंपादकीय

तापमानवाढ आणि वाढते प्रदूषण !

भारतासमोरच नव्हे तर जगासमोर आजमितीस तापमानवाढ रोखणे आणि प्रदूषणाला आळा घालण्याचे मोठे आव्हान समोर उभे आहे. सर्वात मोठे गहिरे संकट, भविष्यातील सर्

दहशतवादाच्या घटना चिंताजनक
निवडणुकीच्या निकालाचा अर्थ
घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन

भारतासमोरच नव्हे तर जगासमोर आजमितीस तापमानवाढ रोखणे आणि प्रदूषणाला आळा घालण्याचे मोठे आव्हान समोर उभे आहे. सर्वात मोठे गहिरे संकट, भविष्यातील सर्वात धोकादायक संकट म्हणून जरी आपल्याला तापमानवाढ आणि प्रदूषण दिसत असले तरी, त्यावर उपाययोजना अतिशय संथगतीने होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काही दशकांमध्ये जगातील सर्वात प्रमुख समस्या तापमानवाढ आणि वाढते प्रदूषण असणार आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यांमध्ये सातत्याने खोकळा, ताप, सर्दी, श्‍वसनासारखे आजार सातत्याने होतांना दिसून येत आहे. खोकला, सदीसारख्या बाबी दोन-चार दिवसांत बर्‍या व्हायच्या. मात्र अलीकडे पंधरा दिवसांत देखील या आजारात बरे वाटतांना दिसून येत नाही. वाढत्या वायू प्रदूषणामुळे खोकला, घसादुखी, श्‍वसनासंबंधित आजार, डोळ्यात जळजळ, शरीरात थकवा जाणवणं यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. वाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले किंवा अनुभवत आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाऊस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हे देखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. यूरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रीवादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. 2005 मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. त्याच वर्षी जुलै 26 रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न भूतो अशा प्रकारचा पाऊस पडला होता. त्याचबरोबर 2023 मध्ये शतकातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून 2023 ची नोंद करता येईल. वाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे. दिवसेंदिवस हवा अधिकाधिक विषारी होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जगातील केवळ 0.0001 टक्के लोकसंख्या कमी प्रदूषित हवेत जगत आहे. वर्षभरातील 70 टक्के दिवसात हवा प्रदूषित असल्याची यातून दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे तापमान वाढ होत असतांना, त्याचा परिणाम जगातील प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे. अनेक जागतिक परिषदा घेत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला असला तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्याने तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. 1906च्या तुलनेत 25 टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. 1906च्या तुलनेत 25 टक्केच उरले आहे. या सर्व बाबी तापमानवाढीमुळे होतांना दिसून येत आहे. त्यामुळे तापमानवाढ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS