Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीवर मोठी कारवाई; 57.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सध्या धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेड

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; 17 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी



नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सध्या धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज, दि. 9 जुलै 2026 रोजी गोदावरी नदी पात्रात मोठी छापा कारवाई केली. मार्कंड शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा आणि वाहतूक करणार्‍या दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून तब्बल 57 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. मार्कंड येथील गोदावरी नदी पात्रातून काही मजूर अवैधरित्या रेतीचा उपसा करून तिची वाहतूक करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह नदी पात्राच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांचे पथक जवळ येत असल्याचे पाहताच, एका विना क्रमांकाच्या हायवा गाड्यातील रेती जागेवरच खाली करून दोन अनोळखी इसम तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.   पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे गुन्ह्यात वापरलेली एक विना क्रमांकाची हायवा गाडी (किंमत 45,00,000/- रुपये), रेती उपसा करण्यासाठी वापरली जाणारी 2 इंजिने (किंमत 6,00,000/- रुपये), रेती उपसा करणारे एकूण 10 तराफे आणि प्रत्येक तराफ्यातील 2 ब्रास याप्रमाणे 6,00,000/- रुपये किमतीची 20 ब्रास रेती, तसेच नदीकाठी पडलेली 25,00,000/- रुपये किमतीची 10 ब्रास रेती असा एकूण 57 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व माल पोलिसांनी तात्काळ जप्त केला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 847/2026 नुसार, भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 303(2), 3(5), सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 48(7), 48(8) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर)  अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड)  सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल भोकर, पोलीस कॉन्स्टेबल जमीर, कदम आणि दत्ता ढगे यांच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, अवैध दारू, जुगार, गुटखा अशा बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS