Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘के.जे.सोमय्या’च्या विद्यार्थ्यांची गोदाकाठ उपक्रमास भेट

कोपरगाव : के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी गोदाकाठ उपक्रमास भेट दिली. स्टॉल धारकांशी चर्चा केली. उत्पादन प

नागरी सहकारी पतसंस्थांसाठी अर्थसंकल्प दिलासादायक : कोयटे
एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात  
अहिल्यानगरमधील पतसंस्थांसाठी ७.४० टक्के व्याजदर घोषित

कोपरगाव : के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी गोदाकाठ उपक्रमास भेट दिली. स्टॉल धारकांशी चर्चा केली. उत्पादन प्रक्रिया, उत्पादन खर्च, विपणन तसेच विक्री व्यवस्थापन या साठी बचत गट करत असलेल्या उपाय योजनाची माहिती घेतली.
कोपरगाव तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक महत्व दर्शविणाऱ्या प्रतिकृती पाहून विद्यार्थी भारावले. हा वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. कालांश उद्योगसमूहाचे संचालक रोहित काले यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या समूहभेट उपक्रमाचे स्वागत केले. या उपक्रमात विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष पगारे, प्रा.डॉ.संजय अरगडे, प्रा.डॉ.रवींद्र जाधव, प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनील गुंजाळ, प्रा.स्वागत रणधीर, प्रा.सोनाली आव्हाड, प्रा.विजय सोमासे, प्रा.हर्षदा पेडणेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

COMMENTS