Homeताज्या बातम्या

मुस्लिम सेवा संघाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच मुस्लिम सेवा शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच

जिद्द आणि मेहनतीचे फळ: मांडवीच्या कु. ज्ञानदा कांबळे यांची मुंबईत ’एमटीएस’ पदी झेप!
श्री. ऋषिकेश जर्नाधन शेळके यांची अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), जि.प. परभणी येथे पदोन्नती
राज्यात दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात बदलाचे संकेत; प्रभावी ठसा न उमटवणार्‍या मंत्र्यांना शिंदे देणार डच्चू



आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच मुस्लिम सेवा शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच्या राज्याध्यक्षा मुमताज मॅडम यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी नवजीवन पतसंस्थेचे संचालक गोविंद वायकर सर यांची अशोकनगर केंद्रप्रमुखपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे शेख रहीम सर यांनी मुस्लिम सेवा संघामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी अहोरात्र कार्य करणारे अविनाश तांदळे सर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास मुस्लिम सेवा संघाचे प्रदेश महासचिव फिरदोस सर, रियाज सिद्दिकी सर, शेख सलीम, माजेद खान आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कारमूर्तींचा शब्दसुमनांनी गौरव माजी नगरसेवक, पत्रकार तथा मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष फारुख मन्यार सर यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रियाज सिद्दिकी सर यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS