Homeताज्या बातम्या

कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित 500 वसुलीचा आरोप; चौकशीची मागणीखाजगी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितल्याचा दावा; आर्थिक फसवणुकीच्या संशयावरून दोषींवर कारवाईची आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांची मागणी

बीड : कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून संमतीपत्र (कन्सेंट लेटर) सुरू करण्यासाठी प्रत्येकी 500 रक्कम एका खाजगी बँक ख

पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबामाजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट
गोशाळांप्रमाणे गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट अनुदान द्याबोगस गोशाळांची चौकशी करा-आम आदमी पार्टीची मागणी
आम आदमी पार्टी बीडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी


बीड : कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून संमतीपत्र (कन्सेंट लेटर) सुरू करण्यासाठी प्रत्येकी 500 रक्कम एका खाजगी बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा समोर आला आहे. या कथित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केली आहे.
येडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना संबंधित रक्कम एका खाजगी व्यक्तीच्या नावावरील बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप आहे. तसेच, लाभार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशात, आज पैसे जमा केले नाहीत तर तुमचे संमतीपत्र सुरू होणार नाही. त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील. ज्यांनी पैसे जमा केले आहेत त्यांच्याच कामाची प्रक्रिया करण्यात येईल, असा मजकूर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. येडे यांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून कोणतेही अधिकृत शुल्क आकारले जात असल्यास ते केवळ शासनाच्या अधिकृत खात्यात किंवा शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसारच स्वीकारले जाणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत खाजगी खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा अत्यंत गंभीर असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी त्यांनी मागणी केली. याप्रकरणी जिल्हा प्रशासन, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने चौकशी करून आर्थिक फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही येडे यांनी म्हटले आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक येडे यांनी दिला आहे.
लाभार्थ्यांना सावध राहण्याचे आवाहन
कोणतीही रक्कम जमा करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून अधिकृत लेखी आदेश, शुल्काबाबतची माहिती आणि शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत. कोणत्याही संशयास्पद किंवा अनधिकृत खात्यावर पैसे जमा करण्यापूर्वी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

COMMENTS