Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी : पालकमंत्री

कराड / प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकर्‍यांचे हिताचे निर्णय वेगान

औंधला नळपाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी निधी मंजूर ; श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती
करोनाविरुद्ध लढाईत हवाईदलही सहभागी, ऑक्सिजन-औषधं करणार एअरलिफ्ट | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
कोर्टाच्या सुरक्षेसाठी चौक्या उभाराव्यात; वाढत्या गोळीबारावरून सर्वोच्च न्यायालय चिंतेत

कराड / प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकर्‍यांचे हिताचे निर्णय वेगाने घेत आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीत असलेल्या बळीराजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही या सरकारची भूमिका आहे. नुकतेच कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून भागभांडवल देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आपले लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा समावेश असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी सुमारे सोळा कोटींचे शासकीय भागभांडवल कारखान्यास मिळणार असल्याने राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
ते दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 मधील 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे हिंदूराव देसाई, भिमराव चव्हाण, शंकर माने, बबन कदम, सुरेश काटे, संभाजी पाटील, भाऊसाहेब भंडारे, उत्तम साळूंखे, शामराव पवार, अधिकराव देसाई, सुभाष निकम या ज्येष्ठ 11 सभासदांच्या हस्ते झाला. यावेळी चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, चि. आदित्यराज देसाई यांच्यासह व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, माजी चेअरमन अशोकराव पाटील, संचालक शशिकांत निकम, बबनराव शिंदे, प्रशांत पाटील, भागोजी शेळके, शंकरराव पाटील, सोमनाथ खामकर, विजय सरगडे, सुनील पानस्कर, विजय सरगडे, संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ. दिपाली पाटील, विजय पवार, जालंदर पाटील, विजयराव मोरे, डी. एम. शेजवळ, संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, विष्णू पवार, बबनराव भिसे, प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते, कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण महापुजा झाली.
आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असे आदर्श काम करा : ना. शंभूराज देसाई
मरळी, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा डोंगरी व दुर्गम भागातील कमी क्षमतेचा कारखाना आहे. कारखान्याचे पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या पुर्णत्वाकडे गेले आहे. कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांना शासकीय भागभांडवल देण्याचा जो निर्णय झाला. त्यामध्ये आपल्या कारखान्याचा समावेश त्यामुळे आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल, असे आदर्शवत काम सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचेकडून व्हावे, अशी अपेक्षाही ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

COMMENTS