Homeताज्या बातम्या

इमारत भ्रष्टाचार विरोधात बीड जिल्हा परिषदेसमोर नवीदोद्दीन सिद्दिकी यांचे धरणे आंदोलन

जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात उपअभियंता बांधकाम विभाग इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट, बोगस आणि कालबाह्य ढाचा वापरून केले जात असल्याचा आरोप करत महारा

क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायद्यासाठी जनजागृती मोहीम; राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद22 जूनच्या अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  



जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात उपअभियंता बांधकाम विभाग इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट, बोगस आणि कालबाह्य ढाचा वापरून केले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना, माजलगावच्या वतीने बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी संबंधित कंत्राटदार (गुत्तेदार), अभियंता आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा तसेच स्थानिक लोक प्रतिनिधीच्या जवळचे मानले जाणारे सहायक व नातेवाईक आणि स्वतःचे जाती-जमातीचे कार्यकर्ते यांच्याशी संगमत करत मोठे भ्रष्टाचार केले असून निकृष्ट कामे फक्त बिलं उचलण्यासाठी व शासनाच्या डोळ्यात धुळटाकून केले जात आहे. असा आरोप करत बोगस बांधकामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. जनहितार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये ’लोकहित संस्थे’चे अध्यक्ष अरुण उर्फ अण्णा माणिकराव अलझेंडे, उपाध्यक्ष अनंतराव डुकरे, सचिव प्रेम अलझेंडे तसेच ’मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष अरफात खान, सचिव सय्यद सलमान, कोषाध्यक्ष वाजेद मोमिन आणि मुशीर इनामदार यांच्यासह दोन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत मुख्य सचिवांनी आंदोलकांशी चर्चा केली. सदर निकृष्ट कामाची आणि संबंधित दोषी अधिकारी व गुत्तेदारांची सखोल चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा असाच सुरू राहील आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे माजलगाव तालुका अध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी यांनी दिला.

COMMENTS