Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर बैठक, पण चंपावती ,सेंट अन्स शाळेबाहेर जीवघेणी परिस्थिती कायम!शाळा सुटल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर पालक-विद्यार्थ्यांची गर्दी; मोठा अपघात होण्यापूर्वी उपाययोजना करा – डॉ. गणेश ढवळे

बीड शाळेच्या बसमधून उतरलेल्या एका विद्यार्थिनीला रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून ती जखमी झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द

आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय; 2 किमी मार्गावर 1,500 खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यातरुंदीकरण व नव्याने डांबरीकरणाची तातडीची मागणी; आंदोलनाचा इशारा
पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे


बीड शाळेच्या बसमधून उतरलेल्या एका विद्यार्थिनीला रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून ती जखमी झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेतली. मात्र, बैठकीतील सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत असून, नगर रोडवरील चंपावती शाळेबाहेर शाळा सुटल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी गर्दी विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे.
दि. 29 जून रोजी जिल्हा स्काऊट-गाईड भवन येथे मुख्य शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील  व अप्पर पोलीस अधीक्षक सलीम शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व शालेय व्यवस्थेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक शालेय बसमध्ये कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा, महिला अटेंडंटची नियुक्ती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उतारासाठी आवश्यक नियमांचे पालन, शाळांबाहेरील टवाळखोर व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विनापरवाना वाहन चालविणे रोखण्यासाठी शाळा प्रशासन व पोलिसांनी समन्वयाने काम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मात्र, या बैठकीनंतरही नगर रोडवरील चंपावती शाळेबाहेर सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणार्‍या पालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेक पालक गेटलगतच्या नालीवर तसेच थेट राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहत असल्याने भरधाव वाहनांमुळे विद्यार्थी व पालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने वाहतूक नियंत्रण, बॅरिकेड्स, झेब्रा क्रॉसिंग, वेगमर्यादा आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती यांसारख्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी मुख्य शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सलीम शेख, वाहतूक शाखेचे प्रमुख वैभव पाटील आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे., प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कार्यरत ठेवणे.  , प्रत्येक बसमध्ये महिला अटेंडंटची नियुक्ती करणे.  , विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उतारासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे.  , शाळांबाहेरील टवाळखोर व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे.  , अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विनापरवाना वाहन चालविण्यावर नियंत्रण ठेवणे.  , शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्यात नियमित समन्वय ठेवून शाळांबाहेरील वाहतूक सुरक्षित करणे. बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS