बीड : माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना युवा लोकमित्र (महाराष्ट्र शासन जाहिरात सूची समाविष्ट साप्ताहिक) यांच्या 5 व्या व

बीड : माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना युवा लोकमित्र (महाराष्ट्र शासन जाहिरात सूची समाविष्ट साप्ताहिक) यांच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा-2026 मध्ये ‘मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 20 जून रोजी ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शी नाका, बीड येथे पार पडला. भारतीय सैन्यात उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर प्रकाश वाघमारे यांनी समाजातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने सक्रिय भूमिका घेत सामाजिक आंदोलक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत युवा लोकमित्र परिवार, बीड यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानानंतर विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन युवा लोकमित्र परिवार, बीड यांच्या वतीने करण्यात आले होते. निवड समितीने त्यांच्या देशसेवा व सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव करत हा सन्मान प्रदान केला असल्याची माहिती साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांनी दिली.

COMMENTS