शेवगाव : शेवगाव शहरात अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ४ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विदेशी मद्याच्या बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कारही ताब्यात घेण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना २ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गोपनीय माहिती मिळाली होती की, शेवगाव शहरातून एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीची पडताळणी करून त्यांनी तपास पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार शेवगाव-आखेगाव मार्गावरील मुंढे चौक येथे सापळा रचण्यात आला. संशयित स्विफ्ट डिझायर कार अडवून तपासणी केली असता वाहनात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रामभाऊ तुळशीराम गुंजाळ (रा. दहिगावने, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. त्याच्याकडे मद्य विक्री अथवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी आरोपीकडून टुबॉर्ग कंपनीच्या ६५० मिली क्षमतेच्या १२० बाटल्या (किंमत २४ हजार रुपये), किंगफिशर कंपनीच्या ६५० मिली क्षमतेच्या ३६ बाटल्या (किंमत ७ हजार २०० रुपये) तसेच ४ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ४ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिवाजी आठरे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल शेवगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप तसेच पोलीस कर्मचारी ईश्वर बैरड, शाम गुंजाळ, प्रशांत आंधळे, धनेश्वर पालवे, वसंत वैद्य, राजू बडे, राहुल आठरे, राहुल खेडकर, सचिन पिरगळ आदींच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अंमलदार गोऱ्हे करीत आहेत.

COMMENTS