निघोज : नैसर्गिक ऑक्सिजन किती महत्वाचा आहे याची जाणीव कोरोना काळात सातत्याने होत होती. म्हणूनच आजही माणसी एक झाडाची गरज असून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील कदम यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने निघोज येथील वेताळबाबा स्टेडियम परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी पंचवीस झाडांचे वृक्षारोपण करीत असोसिएशनने वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यावेळी डॉ.कदम बोलत होते.’एक वृक्ष लावूया… हरित उद्यासाठी हातभार लावूया’ हा संदेश सर्वत्र देत याचा समारोप निघोज येथील वेताळबाबा स्टेडियम परिसरात करण्यात आला. वरील गाव व परिसरात एकाच दिवशी या डॉक्टर्स असोसिएशनने दोनशे पेक्षा जास्त झाडे लावीत वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे. वर्षभर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या डॉक्टर्स असोसिएशनने सामाजिक कामांच्या माध्यमातून सेवाभाव जपण्याचे काम केले आहे.सदर प्रसंगी डॉ सुनील कदम, डॉ. सुभाष मावळे,डॉ अजित लंके,डॉ पांडुरंग थोरात,डॉ बाळासाहेब घोगरे, डॉ सुनील बेलोटे,डॉ खामकर, डॉ कांडेकर,डॉ शेख,डॉ खोसे,डॉ जाधव,डॉ आढाव,डॉ. आबासाहेब खोडदे, डॉ गागरे,डॉ कंरजूले,डॉ मोरे,डॉ पठारे,तसेच डॉ सुनीता लाळगे,डॉ गौरी कोल्हे,डॉ ऐश्वर्या बेलोटे,डॉ वैशाली थोरात आदी डॉक्टर मंडळी उपस्थित होते.वेताळबाबा स्टेडियमचे आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी या असोसिएशनचे आभार मानले.

COMMENTS