परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 4 (ब) अंतर्गत सावता माळी वेस, गणेशपार येथील आयुष्मान आरोग्य मंदिर (शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे रविवारी (

परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 4 (ब) अंतर्गत सावता माळी वेस, गणेशपार येथील आयुष्मान आरोग्य मंदिर (शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे रविवारी (दि. 28 जून 2026) विशेष पोलिओ लसीकरण अभियान तसेच आरोग्य सुविधांच्या पाहणीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला परिसराचे युवा नेते केशव रंगनाथ नागरगोजे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी लहान बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. तसेच पालकांनी आपल्या बालकांचे वेळेवर लसीकरण करून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले. या उपक्रमाचे नियोजन व आयोजन भाजपच्या नगरसेविका सौ. मीरा केशव नागरगोजे यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आले होते. यावेळी केशव नागरगोजे यांनी आरोग्य केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली. उपलब्ध वैद्यकीय सेवा, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था, रुग्णांना मिळणार्या सुविधा तसेच केंद्रातील एकूण कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांना अधिक चांगल्या आणि प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्यांनी नागरिकांना मिळणार्या सेवांबाबत माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वतीने केशव नागरगोजे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच पोलिओमुक्त समाज निर्मितीच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS