Homeताज्या बातम्या

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 8.06 लाखांचा ’बडा दोस्त’ पिकअप जप्त

गेवराई शहरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप वाहनासह 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद

शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं
गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ७.५० लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त



गेवराई शहरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप वाहनासह 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अज्ञात चालक व वाहनमालकाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद पिकअप वाहन आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही वैध परवान्याशिवाय गौण खनिज (वाळू) वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाहनासह वाळू असा एकूण 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात चालक व वाहनमालकाविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई गेवराई पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS