कर्तव्य दक्षतेवर उगवला सुड!

Homeसंपादकीयदखल

कर्तव्य दक्षतेवर उगवला सुड!

अकरा महिन्यांच्या कार्यकाळात नाशिकच्या पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे.मग दुखावले कोण? ऑननलाईन जुगार चालविणारे रोलेट किंग आणि त्या

शिवसेनेची झालेली वाताहत
आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी
नितीश कुमारांचे राजकीय भवितव्य

अकरा महिन्यांच्या कार्यकाळात नाशिकच्या पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे.मग दुखावले कोण? ऑननलाईन जुगार चालविणारे रोलेट किंग आणि त्यांचा राजाश्रय? अवैध मद्य तस्कर आणि त्यांना पाठबळ देणारे पुढारी? गुटखा तस्कर आणि त्यांच्या कमाईवर अलिशान गाड्यांच्या कर्जाचे बँक हप्ते भरणारे खादीधारी? की गाईच्या रक्तावर आपले संसार थाटणारे कथित प्रतिगामी पुरोगामीत्वाची शाल पांघरणारे पांढरे बगळे? असा सवाल सामान्य जनतेला छळत आहे.सचिन पाटील जिल्ह्यासाठी वर्षा दोन वर्षाचे पाहूणे आहेत.आज नाही तर उद्या ते जाणार आहेत,मात्र अशा प्रकारच्या सुड उगविणाऱ्या बदलीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होते.नितीधैर्य खचते,सचिन पाटील यांचे उत्तराधिकारी म्हणून कधीतरी कुणीतरी येणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मनावर या बदलीचा काय परिणाम होईल,मुक्तपणे तो अधिकारी काम करू शकेल का?

नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची कार्यकाळ पुर्ण होण्याअधी झालेल्या बदलीने समाज माध्यमांसह प्रसार माध्यमांची मोठी जागा व्यापली आहे.खरेतर प्रशासनात कर्तव्य करण्याची जबाबदारी स्वीकाराली म्हणजे एका विशिष्ट कालावधीच्या टप्प्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली क्रमप्राप्त आहे.हे वास्तव शासकीय नोकरदारांनी स्वीकारलेले असते.या बदली प्रक्रीयेविषयी सहसा कुणी कुरबूर करीत नाही.मात्र शासनाच्या धोरणांप्रमाणे निश्चित केलेला कालावधी पुर्ण होणे गृहीत धरलेले असते नव्हे तो नियमच आहे,नियमाला अपवाद असतो.तसा अपवाद बदलीच्या प्रक्रीयेतही अनेकदा वापरला जातो,एखादा अधिकारी कामचुकारपणा करीत असेल,त्या अधिकाऱ्याच्या कामकाज शैलीचा फटका व्यापक जनहिताला बसून सामाजिक हित बाधीत होत असेल,शासनाच्या धोरणांची पायमल्ली होत असेल,शासकिय निधीचा अपव्यय केल्याचा ठपका ठेवला गेला असेल,एखाद्या अधिकाऱ्याविषयी गंभीर तक्रारी असतील तर अशा अधिकाऱ्याचा कार्यकाळ पुर्ण झाला नसेल तरीही बदली करण्याचा हक्क शासान अधिकारात राखीव आहे.मात्र यापैकी कुठलेच संयुक्तिक कारण नसेल तर झालेली बदली षडयंत्राचा भाग,सुड उगविण्याचा प्रयत्न अशा जातकुळीत नोंदवली जाते,महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशा सुड उगविणाऱ्या बदल्या अधूनमधून होत असतात.नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची अवेळी झालेली ही बदलीही या सुड उगविण्याच्या जातकुळीतील आहे असा संशय व्यक्त होऊ लागल्याने समाज माध्यमांसह प्रसार माध्यमांवरही या बातमीने बऱ्यापैकी जागा व्यापली आहे.
महाराष्ट्रात पोलीस महासंचालकांनी काढलेल्या परिपत्रकात एकट्या सचिन पाटील यांचेच नाव नाही तर जवळपास पावणे दोनशे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असतांना नाशिकच्या पोलीस अधिक्षकांची बदली सुड उगविण्यासाठी झाली असे का बोलले जाते? कुणी घेतला हा सुड? प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलीस अधिक्षक म्हणून सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून बदलीचा आदेश हाती पडेपर्यंत केलेल्या कामकाजाचा धांडोळा घेणे अपरिहार्य आहे.


सप्टेंबर २०२० मध्ये सचिन पाटील यांनी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुर्वाश्रमीच्या अधिक्षक आरती सिंग यांनी बसवलेली जिल्हा पोलीस दलाची घडी विस्कळीत न करता कामकाज सुरू केले.पदभार स्वीकारला तेंव्हा नाशिक जिल्हा कोरोना महामारीच्या विळख्यात पुर्णपणे अडकलेला होता.जिल्हा वासियांना या महामारीची बाधा होऊ नये म्हणून शासनाने आखून दिलेल्या निर्बंधांच्या चौकटीत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेला नेटकेपणाने कामाला लावले.या धावपळीत जिल्हा पोलीस दलातील सहकाऱ्यांना या विषाणूची बाधा होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना राबवून खबरदारी घेतली.त्यातूनही बाधा झालीच तर तन मन आणि धनाचीही रसद पुरवून औषधोपचार करवले.एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरात दुर्दैवी प्रसंग ओढावला तर स्वतः भेट देऊन आवश्यक ती सर्व मदत देऊ केली,व्यक्तीगत आणि प्रशासकीय अडचणीत पाठीशी उभा राहणारा अधिक्षक कुटूंब प्रमुखाच्या भुमिकेत जिल्हा पोलीस दलाने अनुभवला.त्यातून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद जिल्हा पोलीस दलाच्या मनावर ठसठशीतपणे बिंबले आणि त्याचा सकारात्मक परिणाम कार्यक्षमतेवर झाला,आणि मग जिल्ह्यात कायदा सुव्यस्था राबविण्यात या कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर पोलीस अधिक्षकांनी करून घेतला.


दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राबवितांना पारदर्शकपणा जीवंत ठेवला.पोलिस यंत्रणा धनदांडग्यांची,प्रतिष्ठीतांची बटीक आहे ही सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेली भावना दुर केली,राजकारण्यांच्या हातचे बाहूले न बनता भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होतांना घेतलेली शपथ पुर्णत्वास नेण्यासाठी कुठलीही किंमत मोजण्याची तयारी ठेवली.उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक ४० पोलीस ठाणे असलेले जिल्हा पोलीस दल,पाचा जिल्ह्यांची आणि दोन राज्यांची सीमा अशी प्रचंड व्याप्ती असलेल्या पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून काम करतांना मोठी आव्हाने समोर होती.परराज्यातून परजिल्ह्यातून होणारी अवैध मद्य,गुटखा तस्करी,गोवंशाची तस्करी रोखतांना या आव्हानांचा त्यांनी लिलया सामना केला.जिल्ह्यातील स्थानिक जमीनदारांमधील वादातही कठोर न्याय भुमिका घेतली.जिल्ह्यातील बेकायदा गोवंश कत्तलखाने उध्वस्त केले.मालेगावसारख्या संवेदनशील शहरात सुरू असलेला एका आमदाराच्या भावाने सुरू केलेला बेकायदेशीर बायो डिझेल पंप उध्वस्त केला.अनेक तरूणांना देशोधडीला लावून आत्महत्येस प्रवृत्त करणारा,अनेक संसारांची होळी करण्यास कारणीभूत ठरलेला रोलेटचा ऑननलाईन जुगार चालविणारा किंगही गजाआड केला,याशिवाय रईसा जाद्याआच्या पिलावळीचा ऐषोराम हैदोस अड्डा असालेले हुक्का पार्लर्स आणि रेव्ह पार्ट्याही उधळून लावल्या,सोबत आणखी एक उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधिक्षकांच्या हातून झाली.कांदा आणि द्राक्ष उत्पादकांकडून माल खरेदी करायाचाआणि लाखो रूपये बुडवून पोबारा करायचा प्रघात व्यापाऱ्यांनी अलिकडच्या काळात सुरू केला होता,या ठग व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळून बुडालेले पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रीया पोलीस अधिक्षकांनी सुरू केली होती.त्याचवेळी बदलीचा आदेश आला आणि जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत, पोलीस अधिक्षकांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटना,पत्रकार संघटना एकवटल्या आहेत.समाज माध्यमांवरही नेटकरी सक्रीय होऊन या बदलीचा निषेध करीत आहेत.
खरेतर या अकरा महिन्यांच्या कार्यकाळात पोलीस अधिक्षकांचे काम व्यापक समाजहितासाठी पोषक आहे.मग दुखावले कोण? ऑननलाईन जुगार चालविणारे रोलेट किआग आणि त्यांचा राजाश्रय? अवैध मद्य तस्कर आणि त्यांना पाठबळ देणारे पुढारी? गुटखा तस्कर आणि त्यांच्या कमाईवर अलिशान गाड्यांच्या कर्जाचे बँक हप्ते भरणारे खादीधारी? की गाईच्या रक्तावर आपले संसार थाटणारे कथित प्रतिगामी पुरोगामीत्वाची शाल पांघरणारे पांढरे बगळे? असा सवाल सामान्य जनतेला छळत आहे.सचिन पाटील जिल्ह्यासाठी वर्षा दोन वर्षाचे पाहूणे आहेत.आज नाही तर उद्या ते जाणार आहेत,मात्र अशा प्रकारच्या सुड उगविणाऱ्या बदलीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होते.नितीधैर्य खचते,सचिन पाटील यांचे उत्तराधिकारी म्हणून कधीतरी कुणीतरी येणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मनावर या बदलीचा काय परिणाम होईल,मुक्तपणे तो अधिकारी काम करू शकेल का? त्यांनीही कुणाच्या तरी तस्करी हातातील बाहूले बनून काम करायचे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहील.

COMMENTS