Homeताज्या बातम्या

आम्ही तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी काम करतोसचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर र

पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!
राज्यसभेसाठी नवनीत राणा यांची मोर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट
बीडच्या विकास प्रश्नी डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतली पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट-अग्निशामक दलासाठी 2 वाहने मिळणार-रस्ते, शेतीसह प्रलंबित कामांवरही चर्चा


मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अहिर यांचे स्वागत केले आणि विरोधकांवर टीका केली. शिंदे म्हणाले की, शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना असून विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन अनेक लोकप्रतिनिधी पक्षात येत आहेत. आम्ही तोडण्यासाठी काम करत नसून जोडण्यासाठी काम करत आहोत, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून सुरू असल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला.
अलीकडील काळात काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या आगमनाला महत्त्वपूर्ण राजकीय घटना म्हटले. पुढील काळातही अनेक नेते विकासाच्या दृष्टीने योग्य वाटणारा मार्ग स्वीकारतील, असे संकेत त्यांनी दिले. सचिन अहिर यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, त्यांनी कामगार, गिरणी कर्मचारी, मच्छीमार समाज आणि मुंबईतील स्थानिक नागरिकांच्या प्रश्‍नांवर सातत्याने काम केले आहे. तळागाळातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या सहभागामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीला विधान परिषदेत बहुमत असल्याने सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून निवड होण्याची शक्यता व्यक्त करत शिंदे म्हणाले की, ते संपूर्ण महाराष्ट्रातील सदस्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करतील. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्याच्या विधिमंडळीन कामकाजाला होईल, असेही त्यांनी नमूद केले. 30 जून 2022 रोजी आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि आजही त्याच दिवशी पक्षात महत्त्वाची भर पडत असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी हा राजकीय योगायोग असल्याचे सांगितले. राज्यातील पायाभूत सुविधा, विकासकामे आणि आर्थिक प्रगतीसाठी महायुतीने संयुक्तपणे काम केल्याचा दावाही त्यांनी केला. अलीकडील राजकीय वक्तव्यांच्या संदर्भात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काही नेत्यांची भूमिका ही केवळ राजकीय सोयीसाठी बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला.नीलम गोर्‍हे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम
उपसभापतीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा असतानाही डॉ. नीलम गोर्‍हे यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. सचिन अहिर यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दर्शवल्याने पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांना विराम मिळाला आहे.
मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन : सचिन अहिर
यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सुरू असलेल्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापतीपदाची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद करत त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठीही काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. राजकीय मतभेदांवर योग्य व्यासपीठावर भूमिका मांडू, मात्र सध्या मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS