Homeताज्या बातम्या

भर पावसामध्ये गटनेते हारूणभाई इनामदार यांनी शहरातील विविध भागांची केली पाहणीनगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना नाले व गटारींची नियमित स्वच्छता करण्याच्या दिल्या

केज शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गट नेते हारूणभाई इनामदार यांनी भर पा

विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरीमोबाईल चोरी करणारी आंतरतालुका टोळी 2 तासांत गजाआड; 9 मोबाईल जप्त



केज शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गट नेते हारूणभाई इनामदार यांनी भर पावसात शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्ते, नाले, गटारी तसेच स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान हारूणभाई इनामदार यांनी नगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना नाले व गटारींची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. पावसाचे पाणी साचणार नाही, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण होतील, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, तसेच शहरातील व्यापारी व नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन हारूणभाई इनामदार यांनी केले. भर पावसात शहराची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. स्वतः ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी भर पावसात शहरातील विविध भागात जाऊन पाहणी करून व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन व्यापार्‍यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कर्मचार्‍यांना सूचना दिल्याबद्दल नागरिकांतून त्यांचे समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, मुकादम भीमा शिंदे, आसेफ इनामदार, पठाण साहेब, मुफसील शेख, सज्जाद इनामदार, बापू कापरे यांच्यासह नगरपंचायत चे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS