Homeताज्या बातम्या

प्रथमेश कोळेकर यांना एमबीबीएस पदवी प्रदान

मुंबई : सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा विश्‍व विद्यापीठाने प्रथमेश सुनील कोळेकर यांना एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाची पदवी अधिकृतरीत्या प्रद

पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
अकोले तालुक्यात पूर्वा जाजू प्रथम; मॉडर्न ज्युनियर कॉलेजचा बारावीचा 93.90% निकाल
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 


मुंबई : सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा विश्‍व विद्यापीठाने प्रथमेश सुनील कोळेकर यांना एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाची पदवी अधिकृतरीत्या प्रदान केली. वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना ‘बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस)’ ही पदवी देण्यात आली.
विद्यापीठाच्या कुलगुरू, कार्यकारी परिषद तसेच शैक्षणिक परिषदेच्या मान्यतेनंतर हा पदवीप्रदान सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने प्रथमेश कोळेकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाला नवी दिशा मिळाली असून, समाजसेवा आणि आरोग्यसेवेच्या कार्यात ते महत्त्वपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS