Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर

मुंबई : येथील जे.जे. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा शनिवारी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने अ

बारा वर्षीय मुलाने केली एका २६ वर्षीय युवकाची हत्या
पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात 3 कोटींचा दरोडा
राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे

मुंबई : येथील जे.जे. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा शनिवारी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने अखेर पदमुक्त झाले आहेत. त्यामुळे जे जे हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन आता थांबणार का? हे पाहणे आता महत्त्वाच ठरणार आहे.
 मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशात आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास जे. जे रुग्णालय प्रश्‍नी मार्डने सोमवारपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असताना आपल्या मागण्यांसाठी निवासी डॉक्टर ठाम आहेत. या डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. नेत्रशल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात आणि इतर मागण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अजूनही सुरुच आहे.

COMMENTS