Homeताज्या बातम्या

महेश दीक्षित आयबीचे (IB) नवे संचालक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी महेश दीक्षित यांची देशाच्या अंतर्गत गुप्तचर विभागाच्या (Intelligence Bureau - IB) संचालकप

रस्ता मंजूर, निधी मंजूर; काम कधी सुरू होणार? प्रा. सनी वाघमारे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी
नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा ’सिंघम’च्या हाती; गुन्हेगारांबरोबरच राजकीय दबावालाही द्यावी लागणार टक्कर!
दहशतवाद विरोधी तज्ज्ञ महेश दीक्षित आता आयबीचे नवे प्रमुख

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी महेश दीक्षित यांची देशाच्या अंतर्गत गुप्तचर विभागाच्या (Intelligence Bureau – IB) संचालकपदी नियुक्ती केली आहे. ३० जून रोजी कार्यकाळ पूर्ण करणारे विद्यमान संचालक तपन कुमार डेका यांच्या निवृत्तीनंतर महेश दीक्षित ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतील.

महेश दीक्षित हे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला होता. त्यांची या पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील विशेष घटनात्मक तरतूद (कलम ३७०) रद्द करण्याच्या अत्यंत संवेदनशील काळात त्यांनी श्रीनगर विभागाचे प्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या याच दांडग्या अनुभवाचा विचार करून केंद्र सरकारने त्यांच्याकडे देशाच्या अंतर्गत सुरक्षेची सर्वोच्च जबाबदारी सोपवली आहे.

COMMENTS