Homeताज्या बातम्या

साक्षाळ पिंपरी येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शनमोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न

बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेली ताजिया मिरवणूक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरली. गावातील सर्व समाजबांधवांनी

द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन
समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळखमहंत उद्धव महाराज मंडलिक ; देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेची सांगता
कपिलधारवाडी येथे 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन



बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेली ताजिया मिरवणूक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरली. गावातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शांततेत पार पाडली.
गुरुवारी सायंकाळी गावातील महेबुसुबानी दर्गा येथून ताजिया मिरवणुकीला प्रारंभ झाला. या हुसैनच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक मुख्य रस्ता, बाजार चौक, हनुमान मंदिर मार्गे विसर्जन स्थळापर्यंत पोहोचली. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे हिंदू बांधवांनी ठिकठिकाणी ताजियाचे स्वागत करत पाणी व शरबताचे वाटप केले. त्यामुळे गावात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मोहरम ताजिया यशस्वी करण्यासाठी सवारी खिदमतगार म्हणून भागवत काशीद, नरसिंग क्षीरसागर, मंगबुल शेख, शिवाजी वखरे, संभाजी सामसे आणि असलम तांबोळी यांनी मागील दहा दिवसांपासून परिश्रम घेतले. ताजियाची सजावट, मिरवणुकीचे नियोजन तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी खिदमतगार भागवत काशीद म्हणाले, मोहरम हा त्याग व बलिदानाचा संदेश देणारा सण आहे. हिंदू-मुस्लिम सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन तो साजरा केला, याचा आनंद आहे. बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली. गावातील पोलीस पाटील तसेच तंटामुक्त समितीनेही चोख बंदोबस्त ठेवला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणूक यशस्वी झाल्यानंतर सर्व खिदमतगार व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. धर्म कोणताही असो, माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश देत साक्षाळ पिंपरी गावाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे.

COMMENTS