बीड: शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी केज व परळी विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. प्रतीभा अशोक थोरात यांची महिला सेना प्रभारी जिल्हाप्र

बीड: शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी केज व परळी विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. प्रतीभा अशोक थोरात यांची महिला सेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत ही नियुक्ती प्रभारी स्वरूपात कायम राहणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रसार करत पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉ. थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या डॉ. थोरात यांच्या या नियुक्तीमुळे केज व परळी विधानसभा क्षेत्रातील महिला सेनेच्या कामाला मोठी गती मिळेल, असा विश्वास स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. अधिकृत नियुक्तीनंतर, आगामी काळात महिलांचे संघटन अधिक मजबूत करून पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार डॉ. प्रतीभा थोरात यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

COMMENTS