Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर

अभिजीत पानसेंनी राऊतांची भेट घेत युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेच संजय राऊत उद्ध

‘माफी मांगो राज ठाकरे…’
उद्धव-राज येणार एकत्र ?
महाराष्ट्र एकीकरण समितीला संधी द्या

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेच संजय राऊत उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर तर अभिजीत पानसे राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर गेले. त्यामुळे मनसेने अभिजित पानसे यांच्यातर्फे ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये सामना कार्यालयात 15 मिनिटे चर्चा झाली. त्यापूर्वी दोघांनी भांडूप ते सामना कार्यालयातपर्यंत एकत्र कारने जवळपास सव्वा तास प्रवास केला. म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास दीड तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, अभिजित पानसेंनी मनसेचा युतीचा प्रस्ताव संजय राऊत यांना दिला, अशी चर्चा आता रंगली आहे. अभिजित पानसे यांनी युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे सांगितले. मात्र, संजय राऊत यांच्यासोबतची भेट संपताच अभिजित पानसे थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले. तर, संजय राऊतदेखील सामना कार्यालयातून तातडीने मातोश्रीवर दाखल झाले. त्यामुळे मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये याचदृष्टीने खल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित पानसे यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अभिजित पानसे म्हणाले, मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी फार छोटा माणूस आहे. राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही, याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. पक्षात माझ्याहून अनेक वरिष्ठ नेते आहेत. तसा काही प्रस्ताव असलाच तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील. अभिजित पानसे म्हणाले, संजय राऊत यांची व माझी जुनी ओळख आहे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. तसेच, माझे काही खासगी काम होते. या कामांसाठीच संजय राऊतांची भेट घेतली. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपण असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले आहे.

COMMENTS