Homeताज्या बातम्या

कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर

शेवगाव: कर्मयोगी आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे हे एक देशव्यापी व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भ

खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा
पावसाची ओढ; मागच्या वर्षी जूनमध्ये ९० टक्के पेरण्या; यंदा अजून चाड्यावर मूठ नाही!
पाडळी भिल्ल वस्तीतील २० मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

शेवगाव: कर्मयोगी आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे हे एक देशव्यापी व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शेवगाव येथील विद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंती समारंभाप्रसंगी ते बोलत होते. हा जयंती सोहळा गुरुवारी अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डॉ. पुरुषोत्तम भापकर (सेवानिवृत्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर तसेच लेखक, कवी आणि चित्रपट निर्माते) उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शेषराव देशपांडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ऍड. डॉ. विद्याधर काकडे, संस्थेच्या विश्वस्त हर्षदा काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण बिटाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पुरुषोत्तम भापकर आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की, कर्मयोगी आबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच मला शासकीय सेवेत विविध समाजोपयोगी कार्ये करता आली. मी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचा माजी शिक्षक असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. आबासाहेबांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत शेतकरी, कष्टकरी, दीनदलित आणि गोरगरीब जनतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांचा हा समृद्ध वारसा आज त्यांचे चिरंजीव डॉ. विद्याधर काकडे आणि स्नुषा हर्षदा काकडे मोठ्या नेटाने व ताकदीने पुढे चालवत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव बिटाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. जरीना शेख यांनी केले. या सोहळ्यासाठी संस्थेतील आजी-माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS