Homeताज्या बातम्या

भारताच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते आवश्यकच! महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक; अहिल्यानगरमधील शिक्षकाच्या पाठपुराव्यास यश

जामखेड: भारताचे अधिकृत राजचिन्ह (राजमुद्रा) वापरण्याबाबत प्रशासकीय पातळीवर आणि सार्वजनिक क्षेत्रात होणारे गैरप्रकार तसेच नियमांचे उल्लंघन रोखण्या

मुंबईत रेल्वे लोकलमध्ये तरुणाची हत्या; चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्यावरून वाद
वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोजकरांना ऊर्जा : कवाद
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग; गोतस्करीचा मोठा डाव वडवणी पोलिसांनी उधळला

जामखेड: भारताचे अधिकृत राजचिन्ह (राजमुद्रा) वापरण्याबाबत प्रशासकीय पातळीवर आणि सार्वजनिक क्षेत्रात होणारे गैरप्रकार तसेच नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. सर्वच शासकीय कार्यालयांकडून होणारा राजचिन्हाचा अपूर्ण वापर आणि अनधिकृत व्यक्ती किंवा खाजगी संस्थांकडून केला जाणारा राजमुद्रेचा गैरवापर थांबवण्यासाठी अहिल्यानगर येथील शिक्षक शहाजान शेख यांनी सविस्तर माहितीसह शासनदरबारी अनेक महिने सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून प्रशासनाने आता राजमुद्रेचा गैरवापर थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट फौजदारी कारवाई आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही शासनाने दिला आहे.

असे आहे परिपत्रक

शहाजान शेख यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार (क्र. सीईआर-२०२६/प्र.क्र.९८/राशि-१), केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाठवलेल्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अनेक शासकीय कार्यालये आणि संस्था त्यांच्या लेटरहेड, शिक्के, वाहने किंवा प्रकाशनांवर केवळ सिंहांचे चित्र वापरतात आणि त्याखाली असणारे ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य गाळतात, ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. ‘सत्यमेव जयते’ या बोधवाक्याशिवाय भारताचे राजचिन्ह अपूर्ण मानले जाते आणि असा अपूर्ण वापर हा ‘भारताचे राज्य संप्रतीक (अनुचित प्रयोग प्रतिषेध) अधिनियम, २००५’ चा स्पष्ट भंग ठरतो.

भारताच्या राजमुद्रेखाली अनेक ठिकाणी ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य टाकले जात नसल्यासंबंधी शिक्षक शहाजान शेख यांनी सरकारकडे सविस्तर माहितीसह तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आता सामान्य प्रशासन विभागाचे अव्वल सचिव अविनाश सोलवट यांनी परिपत्रकाद्वारे सर्व विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. ‘सत्यमेव जयते’ या बोधवाक्याशिवाय राजमुद्रा अपुरी ठरत असल्याने, शासकीय कामकाजात हे बोधवाक्य अनिवार्यपणे वापरले जाईल याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

COMMENTS