Homeताज्या बातम्या

आरोग्य जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन महत्त्वाचा : प्रा.रुपाली उंडे; बेलापूर महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

बेलापूर : भारताची प्राचीन संस्कृती जगाला दाखवण्यासाठी व आरोग्य विषयी जागरुकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन बेला

र. भ. अट्टल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरायोग नियमित केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो-योगशिक्षक प्रा.राजेंद्र बरकसे
श्री धर्मनाथ विद्यालयात योग दिन उत्साहात  
योग हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा – प्रणिता देवरे-चिखलीकर

बेलापूर : भारताची प्राचीन संस्कृती जगाला दाखवण्यासाठी व आरोग्य विषयी जागरुकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन बेलापूर महाविद्यालयातील योगगुरु प्रा.रुपाली उंडे यांनी केले. त्या बेलापूर येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, डॉ.विनायक काळे, डॉ.संजय नवाळे,प्रा.चंद्रकांत कोतकर उपस्थित होते.  अनेक आजारांवर योगा उत्तम उपाय आहे असेही त्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना म्हणाल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.कोकाटे म्हणाल्या की, ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती आहे .योग फक्त व्यायाम नाही तर तो एकमेकांना जोडणारा दुवा आहे. शरीराला मनाशी, माणसाला निसर्गाशी आणि एका देशाला, दुसऱ्या देशाशी, “एक पृथ्वी एक आरोग्य” ही यंदाची थिम घेऊन आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.विनायक काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.चंद्रकात कोतकर यांनी मानले.

COMMENTS