Homeताज्या बातम्या

अकोले तालुक्यातील दुर्गम जिल्हा परिषद शाळेत ‘क्रांतिकारी’ प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्य वाटप; मूलभूत सुविधांच्या अभावाकडे वेधले लक्ष

अकोले : क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य (के ए ग्रुप १२१७, अकोले) यांच्या वतीने अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिष

अकोले तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात नागरिक आक्रमक; आंदोलनाची हाक, हेरंब कुलकर्णी दारूबंदी आंदोलनाच्या अध्यक्षपदी
 कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार  
कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन

अकोले : क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य (के ए ग्रुप १२१७, अकोले) यांच्या वतीने अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावावी, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत भंडारदरा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेतील विविध समस्याही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे अनेक अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता असूनही उपलब्ध शिक्षक विद्यार्थ्यांना अत्यंत तळमळीने शिक्षण देत आहेत, मात्र शैक्षणिक आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुंढे आणि गंभीरे यांनी विशेष सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गणेश मधे यांनी केले. याप्रसंगी वैभव गोंदके, सूर्या खाडे, किरण खाडे, पवन खाडे, अरुण गोंदके, किशोर धनगर, गोविंद मधे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS