Homeताज्या बातम्या

कोपरगावच्या एसएसजीएम महाविद्यालयात संशोधनासाठी भरीव निधी; रयत शिक्षण संस्थेचा ‘सीड मनी’ उपक्रम

कोपरगाव : एसएसजीएम महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड.संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या संशोधन व विकास धोर

‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन
सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी
‘एसएसजीएम’च्या सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएटसाठी निवड; कोपरगाव महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह

कोपरगाव : एसएसजीएम महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड.संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या संशोधन व विकास धोरणांतर्गत सीड मनी (बीज प्रकल्प) साठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध संशोधन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.  या निर्णयामुळे महाविद्यालया मध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधनाधिष्ठित उपक्रमांना चालना मिळणार असून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
 संशोधन व विकास धोरणानुसार विविध कार्यशाळा, परिसंवाद, आविष्कार स्पर्धा, लघु व दीर्घ संशोधन प्रकल्प, आणि संशोधनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधनपर प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, पेटंट, पुस्तके ई. साठी प्रोत्साहन निधीस महाविद्यालय विकास समितीने मंजुरी दिली आहे.
 या बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे सचिव  प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सदस्य सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, महेंद्र काले, डॉ. बंडेराव तन्हाळ, डॉ. माधव यशवंत, डॉ. देविदास रणधीर, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. निलेश मालपुरे तसेच कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी उपस्थित होते.

COMMENTS