पेठ गावात आठ दिवसांचा कडकडीत स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु : सरपंच मिनाक्षीताई महाडिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेठ गावात आठ दिवसांचा कडकडीत स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु : सरपंच मिनाक्षीताई महाडिक

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पेठ, ता. वाळवा येथे आज गुरुवार, दि. 6 ते गुरुवार, दि. 13 पर्यंत आठ दिवसाचा कडकडीत जनता कफ्यू पाळावा, असे आवाहन पेठ ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई
शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
पैठण व नगर जिल्ह्यातील अत्याचार घटनांतील आरोपी पकडा- डॉ. गोर्‍हे


शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पेठ, ता. वाळवा येथे आज गुरुवार, दि. 6 ते गुरुवार, दि. 13 पर्यंत आठ दिवसाचा कडकडीत जनता कफ्यू पाळावा, असे आवाहन पेठ ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत सरपंच श्रीमती मिनाक्षीताई महाडिक, जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच चंद्रकांत पवार, सपोनि अनिल जाधव, पेठ बिटचे पोलीस हवलदार श्रीकांत अभंगे, हवलदार दीपक भोसले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनपाल माळी, गावकामगार तलाठी मुलाणी, मंडल अधिकारी शेळके, पेठ आरोग्य केंद्राच्या अधिकारी सौ. अर्चना कोडग, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ. वसुधा दाभोळे, माजी उपसरपंच अमीर ढगे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दाइंगुडे व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असून आरोग्य सेवा, औषध दुकाने आदींना परवानगी असून त्यांनी नियमावलीचे पालन करावे. दूध डेअरी व दुध विक्रेत्यांना 7 ते 9 वाजेपर्यंत संकलन व वितरणाची मुभा राहणार आहे. इतर सर्व दुकाने या कालावधीत बंद राहणार असुन या नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. 

COMMENTS