Homeताज्या बातम्या

“न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा वकीलच यशस्वी होतो” – भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा; राहात्यात ॲड. संदीप पुंड यांचा गौरव

राहाता : "न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा, सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करणारा आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणारा वकीलच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खडकेवाके येथे शालेय साहित्य वाटप; भीमशक्ती सामाजिक संघटनेचा उपक्रम
‘गणेश’ परिसराच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार
‘साईयोग’द्वारे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वृक्षसंवर्धन; खटकळी परिसरातील सद्गतीघाटावर स्वच्छता अभियान

राहाता : “न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा, सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करणारा आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणारा वकीलच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो,” असे प्रतिपादन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.

राहाता येथील ॲड. संदीप पुंडलीक पुंड यांनी वकिलीच्या परीक्षेत ७०.३९ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा आणि भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे उत्तम उदाहरण ॲड. संदीप पुंड आहेत. त्यांनी साईसन कॉम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देत आधीच शैक्षणिक योगदान दिले आहे. आता कायद्याच्या क्षेत्रातही त्यांनी यशस्वी पाऊल टाकले असून राहाता न्यायालयाला एक प्रामाणिक, अभ्यासू आणि जनसामान्यांच्या न्यायासाठी झटणारा युवा वकील मिळाला आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS