Homeताज्या बातम्या

शिक्षकाची नोकरी व्यवसाय नसून पवित्र व्रत; नुजहत सय्यद यांच्या कार्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घ्यावा – सलीमखान पठाण

देवळाली प्रवरा : "शिक्षकाची नोकरी ही केवळ पगारासाठी करण्याचा व्यवसाय नसून ते एक पवित्र व्रत आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका नुजहत सय्यद

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू थेट शेतकऱ्याच्या शेतात! राऊतवाडीतील ‘कोकण बहाडोली’ जांभूळ बाग ठरतेय अभ्यासाचा विषय
पुरोहितांनी गावाला जेऊ घातला ‘धोंडा’; गुहा येथे धार्मिक एकात्मतेचा अनोखा संदेश
भोंदू बाबाच्या कथित “चेल्या”वर अत्याचाराचा आरोप प्रकरण दडपल्याची चर्चा; भोंदू बाबा गणेश शिंदे अटकेत

देवळाली प्रवरा : “शिक्षकाची नोकरी ही केवळ पगारासाठी करण्याचा व्यवसाय नसून ते एक पवित्र व्रत आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका नुजहत सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शाळेच्या उन्नतीसाठी आणि समाजहितासाठी दिलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या या निस्पृह कार्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घ्यावा,” असे प्रतिपादन उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.

देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका नुजहत सय्यद यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य निरोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी देवळाली प्रवरा शहरवासीय व मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सय्यद दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन गोरक्षनाथ विटनोर, प्रीती कदम, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अकील बाबा पटेल, अल्ताफ शहा, इमाम सय्यद, शकील खान, गणिभाई बागवान, शिक्षण विस्तार अधिकारी राजमोहमद शेख, योगेश देशमुख, अनिल मेढे, अरुण उबाळे, शहाजी कोळसे, मुख्याध्यापिका शकुंतला गायकवाड यांच्यासह नेवासा, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व अहिल्यानगर येथील शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ शेख, जुनेद शेख, मुसाभाई शेख, हाजी शकील बागवान, रमिज सय्यद व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS