Homeताज्या बातम्या

कर्जतमध्ये बंद बसने उडवला वाहतुकीचा बोजवारा; संतप्त नागरिकांचा एसटी महामंडळाला सवाल

कर्जत : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास एसटी महामंडळाची बस अचानक रस्त्यातच बंद पडल्याने शहरातील वाहतु

प्रियकराने केला अल्पवयीन मुलीचा खून; पुरावा नष्ट करण्यात मदत करणाऱ्या वडिलांसह मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई
असर्जन नाका ते वाघाळा रस्ता ड्रेनेज खोदकामामुळे नादुरुस्त; नागरिकांचे हाल, तात्काळ दुरुस्तीची मागणी
भाजपच्या विधान परिषद निवडणूक बैठकीला आमदार-खासदारांची दांडी; महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत?

कर्जत : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास एसटी महामंडळाची बस अचानक रस्त्यातच बंद पडल्याने शहरातील वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. शाळा व महाविद्यालये सुटण्याची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थ्यांची, पालकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होती. त्यात भर रस्त्यात बंद पडलेल्या एसटीमुळे काही वेळातच वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मागील अनेक दिवसांपासून आठवडे बाजाराच्या दिवशीसुद्धा शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिस प्रशासनाला यश आले होते. मात्र आज एका बंद पडलेल्या एसटीने संपूर्ण व्यवस्थेलाच धक्का दिला आणि पुन्हा शहराची वाहतूक विस्कळीत झाली.

नागरिकांमध्ये यावेळी एसटी महामंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “प्रवाशांना सेवा देण्याऐवजी एसटीच्या डबड्या, गळक्या आणि सतत बंद पडणाऱ्या गाड्या आता लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. एसटी महामंडळाच्या बस नेमक्या प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचवतात की रस्त्यातच बंद पडून नागरिकांना वेठीस धरतात, असा सवालही उपस्थित होत आहे.

आगाराचे काम रखडल्याची चर्चा कर्जत येथे एसटीचे आगार मंजूर असतानाही तांत्रिक व राजकीय अडथळ्यांमुळे त्याचे काम अद्याप रखडल्याची चर्चा आहे. मंजूर आगार प्रत्यक्षात उभे राहत नसल्याने बसच्या देखभाल-दुरुस्तीवर परिणाम होत असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. नागरिकांच्या कराच्या पैशावर चालणाऱ्या महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्याऐवजी त्रासच देण्याचे काम सुरू ठेवले असल्याची टीका होत आहे.

COMMENTS