Homeताज्या बातम्या

नियमबाह्य अतिरिक्त ठरवल्याच्या निषेधार्थ 2 शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू

 तालुक्यातील सावरगाव नसरत येथील शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना कथितपणे नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविण्यात आल्य

ओबीसी आरक्षणाला हात लावल्यास रस्त्यावर उतरू; डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण



 तालुक्यातील सावरगाव नसरत येथील शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना कथितपणे नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. 22 जून 2026 पासून शाळेबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये माध्यमिक विभागातील शिक्षिका श्रीमती मेंडके सोनुबाई आवराव आणि प्राथमिक विभागातील शिक्षक श्री. महेश बाळकिशन फिसके यांचा समावेश आहे. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती सिंधूताई टाले यांच्या कथित मनमानी कारभारामुळे आपल्याला अतिरिक्त ठरविण्यात आल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे. उपोषणकर्त्या शिक्षकांनी आपल्या मागण्यांमध्ये सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच बिंदू नामावली अद्याप अद्ययावत नसून, शासनाने मंजूर केलेल्या संचमान्यतेनुसार आपण अतिरिक्त ठरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. नियम व निकष डावलून अन्यायकारक पद्धतीने अतिरिक्त घोषित करण्यात आल्यामुळे आपल्यावर मानसिक व आर्थिक संकट ओढविल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. न्याय मिळेपर्यंत व संबंधित निर्णय मागे घेऊन योग्य कार्यवाही होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या दोन्ही शिक्षकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन शिक्षण विभागाने वस्तुनिष्ठ चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाकडे परिसरातील शिक्षक संघटना व पालकांचेही लक्ष लागले आहे.

COMMENTS