Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी ः दक्षिणकाशि गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्

सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
वज्रेश्‍वरी मातेच्या यात्रोत्सवास आजपासून सुरूवात
तरुणीवर अत्याचार करून पैशांसाठी धमकावले, गुन्हा दाखल

कोपरगाव प्रतिनिधी ः दक्षिणकाशि गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्वामी लखनगिरी महाराज यांचा सतरावा पुण्यतिथी सोहळा 2 ते 9 एप्रिल दरम्यान ज्ञानेश्‍वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव व विविध धार्मीक कार्यक्रमाने संपन्न होत असून, या पुण्यतिथीची सांगता 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
या पुण्यतिथी सोहळयानिमीत्त 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता हस्ते ज्ञानेश्‍वरी पारायण प्रारंभानिमीत्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्‍वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप व कलशपुजन, हभप राघवेश्‍वरानंद महाराज यांच्या हस्ते ग्रंथपुजन होईल. सकाळी 11 ते 1 याकाळात हभप राम महाराज शिंदे (सुरेगांव-2 एप्रिल) हभप जालिंदर महाराज शिंदे (3 एप्रिल) हभप गणेश महाराज मोरे (4 एप्रिल), हभप श्रावण महाराज जाधव (5 एप्रिल), हभप महेंद्र महाराज निकम (6 एप्रिल), हभप अमोल महाराज गाडे (7 एप्रिल), श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर काशिकानंद महाराज (8 एप्रिल),यांचा किर्तन महोत्सव साजरा होत आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता स्वामी लखनगिरी महाराजांच्या मुर्तीस ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात महामस्तकाभिषेक, महापुजा संपन्न होईल.या पुण्यतिथी सप्ताह काळात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, श्री श्री 1008 गणेशानंद सरस्वती महाराज, श्रध्दानंद महाराज महांकाळ वाडगांव, गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, काशिकानंद सरस्वती महाराज, गोपालनंद महाराज, आदि संत महंत ब्रम्हलिन स्वामी लखनगिरी महाराज समाधी मंदिर स्थानावर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी तनमनधनाने सहकार्य करून किर्तन व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकमठाण पंचकोशीतील लखनगिरी महाराज भक्त मंडळाचे सर्व सहकारी भाविकांनी केले आहे. पंचकोशीतील संवत्सर, यशस्वीतेसाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे. विभांडक ऋषी मंदिर जीर्णोध्दार बडे, कासली, कोपरगांव बेट, जेठरकुमारी, जेडरपाटोदा, माळवाडी, शिंगवे, कुंभारी, भोजडे आदि गावातील भजनी मंडळींनी किर्तन महोत्सव कारवाडी, कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन लखनगिरी महाराज भक्त मंडळाने केले आहे.

COMMENTS