Homeताज्या बातम्या

मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकपोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांचा सत्कार

मोहरम सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या

कब्रस्तानच्या जागेतील रस्ता व नालीचे काम तात्काळ थांबवावेसामाजिक कार्यकर्ते आसीम जरगर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी
वाळू माफियांना संरक्षण प्रकरणी मोठी कारवाईपरभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार



मोहरम सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था, सणाच्या काळातील आवश्यक खबरदारी तसेच सामाजिक सलोखा राखण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांनी उपस्थित शांतता समिती सदस्य व नागरिकांना मार्गदर्शन करताना, मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सहकार्य करून शांतता व बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार डीएसबीचे सानप साहेब, संपादक समीर काझी, शांतता समिती सदस्य तथा उपसंपादक झैद कादरी आणि शेख वसीम यांच्या वतीने करण्यात आला. या बैठकीस शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे मोहरम सण शांततेत आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS