बीड : सौ. के.एस.के. ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस)विभाग व योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून

बीड : सौ. के.एस.के. ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस)विभाग व योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात योग प्रशिक्षक श्री. साहेबराव बीडकर यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते योग प्रशिक्षक श्री. साहेबराव बीडकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी नियमित योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यानंतर सामूहिक योगसाधनेला सुरुवात झाली. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, भ्रामरी यांसह विविध योगासने व ध्यानसाधना केली. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांनी केले. यावेळी पदव्युत्तर संचालक डॉ. खान ए. एस. तसेच पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनएसएस), क्रीडा विभाग तसेच योग समितीचे सदस्य प्रा. अमृतसिंग बिसेन, डॉ. वाणी पी. आर., डॉ. इरलापल्ले पी. बी., डॉ. गायके पी. पी. आणि कॅ. डॉ. पोटे बी. टी. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जयंत साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS