Homeताज्या बातम्या

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; 22 जूनपासून सकाळी 8 ते 12.30 पर्यंतच वर्ग

जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि सर्वत्र उन्हाची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मह

२९ मे ते ५ जून दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा इशारा; उत्तर भारतातील १० राज्यांत दिलासा, उष्णतेची लाट ओसरणार
शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
नागपूर, वर्ध्यात उष्णतेची लाट
Schools in Vidarbha will remain closed on the first day of reopening Maharashtra Rajya Shikshan Sanstha Mahamandal decided know What is the real reason | विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं ...



जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि सर्वत्र उन्हाची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सोमवार, 22 जून 2026 पासून सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहेत. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठी, इंग्रजी, उर्दू तसेच राज्य मंडळ, सीबीएसई आणि इतर सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा आदेश लागू असेल. सर्व शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS