नांदेड/मुंबई : सार्वर्जनिक बांधकाम विभागातील नांदेड येथील तत्कालीन अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी या विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. अ

नांदेड/मुंबई : सार्वर्जनिक बांधकाम विभागातील नांदेड येथील तत्कालीन अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी या विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. अनेक गुन्हे, अटक आणि सुटका, खोटे शिफारसपत्र, बोगस निविदा, डांबर घोटाळा, पूल घोटाळ्याच्या प्रकरणांनी त्यांची कारकीर्द गाजली होती. केवळ गाजलीच नाही तर, अनेक गुन्हे त्यांच्यावर असतांना त्यांना पुन्हा मुख्य अभियंतापदी पदोन्नती देण्याचा घाट घातला जात आहे. इतक्या सर्व चौकशी प्रलंबित असतांना धोंडगे यांना अभय कुणाचे असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असतांना धोंडगे यांनी अक्षरक्षः या विभागातील निधी जितका ओरबाडून घेता घेईल, तितका आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. अति खाल्यानंतर जसे अपचन होते, तोच प्रकार धोंडगे यांच्या बाबतीत झाला. अनेक चौकश्या लागल्या, अनेक गुन्हे दाखल झाले, तरी धोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने दाखवले नाही. त्यामुळे धोंडगे यांची प्रस्तावित होणारी पदोन्नती रोखण्यात यावी. तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत पदोन्नती रोखण्याची मागणी होत आहे.
उपसचिव असतांना झाली होती अटक
नांदेड विभागात तत्कालीन कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे या पदावर केलेल्या गैरकारभारप्रकरणी ते मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असतांना त्यांना अटक करण्यात आली होती. बनावट शिफारसपत्र देऊन नियमबाह्यरित्या मजूर सहकारी संस्थेला कामे देऊन फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. धोंडगे यांनी 27 जानेवारी 2010 रोजी 30 लाखांच्या 7 कामांचे करारनामे करून शासनाची फसवणूक केली होती. त्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतरही धोंडगेंनी आपले राजकीय वजन वापरून अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती करून घेतली होती.
आसना नदीवरील पूल दुरूस्तीची मंजुरी असतांना केले चक्क नवे बांधकाम
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक रंजक किस्से आहेत. त्यातील एक म्हणजे नांदेड जिल्ह्यातील आसने नदीवरील पुलाच्या केवळ दुरूस्तीसाठी मंजुरी मिळालेली असतांना धोंडगे यांनी हा पूल पाडून चक्क नव्याने बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार मे 2024 मध्ये उघडकीस आलेला आहे. त्यावर धोंडगे यांनी तब्बल 30 ते 35 कोटी रूपये खर्च केले असल्याचे दाखवत ही रक्कत आपल्या घशात घातल्याचे दिसून येत आहे.
बोगस सर्व्हेतून 40 लाख रूपये हडप
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी पररभणी शहरातील रस्त्याचे बोगस सर्व्हे दाखवून 40 लाख रूपये हडप केले होते. याप्रकरणात धोंडगे यांच्यासह कार्यकारी अभियंता पाटील, उप अभियंता विघ्ने, यांनी 70 कोटीच्या कामांचा सर्व्हे करण्यासाठी 40 लाखांची निविदा काढत या निधीवर डल्ला मारला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालानंतर या अधिकार्यांवर चार्जशीट दाखल करण्यात आली होती.

COMMENTS