Homeताज्या बातम्या

अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंचा भ्रष्टाचाराचा कळसमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणे

नांदेड/मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी जिथे जाईल तिथे भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे. नांद

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांचीदोषमुक्तीची याचिका न्यायालयाने फेटाळली
वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन करणार; पेपर लीक प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तीव्र संताप!


नांदेड/मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी जिथे जाईल तिथे भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे. नांदेड, परभणी, मुंबई या विविध ठिकाणी पदावर असतांना त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांना झालेली अटक आणि सुटका या बाबी बघता पुन्हा त्यांची पदोन्नती करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी धोंडगे यांनी वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत मुख्य अभियंता पदी वर्णी लावण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. मात्र दाखल असलेले गुन्हे आणि प्रलंबित चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदोन्नती देऊ नये, अशी दैनिक लोकमंथनसह नांदेडकरांची इच्छा आहे.
नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता तसेच अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना अविनाश धोंडगे यांच्या कार्यकाळात अनेक आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय नियमभंग झाल्याचे समोर आलेले आहे. या संदर्भातील काही प्रकरणांमध्ये चौकशी, गुन्हे नोंदणी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे सर्व बाबींचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांची पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. धोंडगे यांच्याविरुद्ध बनावट शिफारसपत्रांच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने कामे मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात ते मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर न्यायालयातून त्यांची जामिनावर सुटका झाली. संबंधित प्रकरणात शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अटकेनंतरही त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय प्रभावाच्या जोरावर पदोन्नती मिळविल्याची चर्चा त्या काळात झाली होती. नांदेड जिल्ह्यातील आसना नदीवरील पुलाच्या कामासंदर्भातही ढोंगे यांचे नाव चर्चेत आले होते. उपलब्ध मंजुरी केवळ दुरुस्तीसाठी असताना पुलाचे संपूर्ण नव्याने बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांवरून करण्यात आली होती. परभणी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनियमितता झाल्याचा आरोपही ढोंगे यांच्यावर करण्यात आला होता. रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक नसतानाही मोठ्या रकमेचे सर्वेक्षण दाखवून शासन निधीचा अपहार झाल्याचे समोर आले होते. या संपूर्ण बाबींचा विचार करता, धोंडगे यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
अभियंता किणी आणि जाधव यांचा नेमका काय होता डाव ?
उपमुख्यमंत्री शिंदे, अधीक्षक अभियंता तांबे यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र
राजकारणात ज्याप्रमाणे काही चाली चालत आपला राजकीय स्वार्थ साधला जातो, त्याचप्रकारे सार्वजनिक बांधकाम पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव यांनी डाव टाकत अधीक्षक अभियंता तांबे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले लांगेबांधे असल्याचे दर्शवत माध्यमांना चुकीची माहिती पुरवून तांबे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची देखील बदनामी करण्याचे षड्यंत्र या अधिकार्‍यांनी आखले होते. यामागे एक अधीक्षक अभियंता आणि या अधिकार्‍यांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे, मात्र सध्यातरी त्या अधीक्षक अभियंत्यांचे नाव गुलदस्त्यातच ठेवणे आवश्यक आहे. उपअभियंता अजय जाधव डहाणू येथे चार वर्षे आणि पालघर येथे चार वर्षे कार्यरत असतांना कोट्यावधींचा निधी त्यांनी लाटला आहे. विविध विभागांत गैरप्रकार, बोगस निविदा, कामे न करतांच बिले अदा करणे, अशी अनेक गैरव्यवहरांची जंत्रीच आमच्याकडे असून त्याचा लवकरच सविस्तर वृत्तांत.

COMMENTS