Homeबीड

उर्दू विषयात जिल्ह्यात प्रथम; कु. कुलसुम आरा जागीरदारचा भव्य सत्कार

बीड शहरातील नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित अलहुदा उर्दू हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी कु. शेख कुलसुम आरा मूनवर पाशा जागीर

संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम 
गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; मातांचा पैठणी देऊन गौरव – बीडमध्ये अनोखा उपक्रम
संजीवनी अभियांत्रिकीच्या तीन शाखांना ‘एनबीए-टीअर वन’ मानांकन    



बीड शहरातील नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित अलहुदा उर्दू हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी कु. शेख कुलसुम आरा मूनवर पाशा जागीरदार हिने सन 2026 च्या एसएससी बोर्ड परीक्षेत उर्दू विषयात 100 पैकी 96 गुण मिळवत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे चेअरमन तथा तंजीम तरक्की उर्दूचे अध्यक्ष डॉ. सय्यद हसीन अख्तर यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात विद्यार्थिनीला प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सय्यद मझहर कादरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. पठाण सिराज खान यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थिनीच्या यशाचा गौरव करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा मांडला. सत्कारानंतर बोलताना डॉ. सय्यद हसीन अख्तर यांनी उर्दू भाषेचे सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबरच उर्दू भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कुलसुम आराने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनीच्या परिश्रमांचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उर्दू विषयाचे सहशिक्षक सय्यद रहबर यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच कुलसुम आराचे वडील मूनवर पाशा जागीरदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. कुलसुम आरा जागीरदार हिने मिळविलेल्या या यशामुळे अलहुदा उर्दू हायस्कूल तसेच बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS